Jump to content

विकिमिडिया विकिमीट भारत २०२१/सौहार्दपूर्ण वातावरण धोरण

From Meta, a Wikimedia project coordination wiki
This page is a translated version of the page Wikimedia Wikimeet India 2021/Friendly space policy and the translation is 80% complete.

उद्दिष्ट

विकिमिडिया विकिमीट भारत २०२१ या कार्यक्रमामध्ये सहभागी सर्व सदस्यांना मैत्रीपूर्ण, सुरक्षित आणि सर्वसमावेशक वातावरण निर्माण करून देण्यासाठी हे धोरण वर्तनाच्या संकेतांच्या रुपात राबवले जाईल.

हे धोरण सर्व कार्यक्रमाला आणि सामुदायिक अवकाशाला, ऑनलाईन आणि प्रत्यक्षात होत असलेल्या, मुख्य आणि सहाय्यक अशा कार्यक्रमांना, बैठकींना, ईमेल यादी , चाचणी कार्यक्रमांना आणि अनौपचारिक कार्यक्रम अशा सर्वांना लागू असेल. या धोरणांचे उल्लंघन झाल्याचे लक्षात आल्यास, त्या सदस्यांवर/सदस्यास ताप्तुरत्या स्वरुपासाठी बंदी, समुदायातून काढले जाणे वगैरे कारवाई करण्यात येऊ शकते.

या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारच्या छळवादाविरुध्द शुन्य-सहनशीलतेचे धोरण अवलंबले जाईल, म्हणजेच कोणत्याही प्रकारचा छळवाद सहन केला जाणार नाही. त्यावर तातडीने कारवाई केली जाईल.

सर्वसमावेशकता

सदर कार्यक्रमात आपण मुक्त आणि सर्वसमावेशक संवाद होण्यासाठी बांधील आहोत. प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेण्याचा मोकळेपणा या व्यासपीठावर सांभाळला जाईल. आपण वय, लिंग, सामाजिक आणि आर्थिक स्तर, संस्कृती, भाषा, नागरिकत्व, राजकीय मते, व्यवसाय, वंश, धर्म, शारीरिक व्यंग अथवा असहाय्यता या सर्वाच्या पलीकडे आपण एकमेकांबद्दल आदर बाळगणार आहोत. वरीलपैकी कोणत्याही एका मुद्द्याला अनुसरून अन्याय्य वागणूक मिळाल्यास ती सहन केली जाणार नाही. व्यंग असलेल्या सहभागी सदस्याना सुद्धा हे नियम लागू असतील.

सहभागी सदस्यांसाठी सामान्य नियम

  • मैत्रीपूर्ण वातावरण आणि एकमेकांचा आदर - एकमेकांशी सौहार्द जपत आपण मैत्रीपूर्ण आणि मोकळे वातावरण अनुभविणे अपेक्षित आहे. दुस-या गटाला दुखाविणारी किंवा कोणावर मानसिक आघात करणारी विधाने टाळणे हे औचित्याचे आहे.
  • सहभाग आणि सहयोग - सर्व वक्त्यांविषयी आदर राखा. आपले प्रश्न विचारताना इतरांना अडथळा होणार नाही आणि कार्यक्रमात खंड पडणार नाही याची काळजी घ्या. इतरांच्या बोलण्याच्या आड येवू नका, प्रश्न दुर्लक्षित करू नका, सर्वांना सहभागी करून घ्या. आपल्याला प्रक्रियेत सहभागी होताना अडचण येत असेल, हेतुपूर्वक त्रास दिला जात असेल तर लगेच व्यक्त व्हा. तसेच सत्राचे समन्वयक आणि आयोजक यांना संपर्क करा.
  • मोकळा दृष्टीकोण - सर्व सहभागी सदस्यांप्रती मोकळा दृष्टीकोण ठेवा. संस्थात्मक, तांत्रिक अथवा काही कारणांमुळे जर कोणावर बंधने आली असतील तर ती स्वीकारा. नोंदणी न केलेले सदस्य या कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाहीत.
  • ओळख - कोणाचीही व्यक्तिगत ओळख जाहीर करू नका. आपले गटाशी असलेले अधिकृत नाते योग्य पद्धतीने जाहीर करा. पूर्वपरवानगीशिवाय कोणाचीही खाजगी माहिती जाहीर करू नका.
  • खाजगीपणा - निनावीपणे सहभागी असणाऱ्या सदस्यांच्या निर्णयाचा सन्मान करा. केवळ ध्वनी सुरु ठेवण्याला मान्यता द्या. ज्यांना जसे संबोधणे अपेक्षित आहे, तसेच संबोधा. ध्वनी अथवा चित्र रेकॉर्ड करायचे असेल तर हेतू स्पष्ट करून पूर्वकल्पना द्या. परवानगी घेतल्याशिवाय करू नका.
  • अस्वीकारार्ह वर्तन - व्यक्तिगत हल्ला, हिंसेची भीती निर्माण करणे, हिंसेला पूरक वर्तन, असभ्य/अश्लील लैंगिक भाषेचा वापर, मुद्द्याला सोडून अनुचित व्यक्तिगत किंवा जाहीर संभाषण हे अस्वीकारार्ह आहे. चर्चेत बाधा आणणे, सतत समूहात अडथळे आणणे, ट्रोलींगच्या द्वारे त्रास देणे इ. वर्तन होत असेल तर संबंधित सदस्यांवर तातडीने कारवाई केली जाऊ शकते.

समन्वय

  • ओळखण्यायोग्यता - व्हिडीओ कॉन्फरन्स दरम्यान सुविधा भूमिकेतील सहभागी आपोआप ओळखला जातो (उदा. तारा चिन्हासह, "सुविधाकर्ता" किंवा "प्रशासक" म्हणून, प्लॅटफॉर्मवर अवलंबून) फॅसिलिटेटर ही व्यक्ती असेल कोण व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू करतो किंवा नेतृत्व करतो. तांत्रिक कारणास्तव हे शक्य नसल्यास किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान सोयीची भूमिका बदलणे आवश्यक असल्यास, हे इतर सहभागींना सूचित केले जाईल.
  • तांत्रिक भूमिका - व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान, फॅसिलिटेटरने तांत्रिक अधिकार वाढवले आहेत. यामध्ये लोकांना जोडणे, पोल देणे, स्पीकर म्यूट/अनम्यूट करणे, ब्रेकआउट रूम तयार करणे आणि इतर वैशिष्ट्ये यासारख्या फंक्शन्सचा व्यायाम करण्याची क्षमता समाविष्ट आहे.
  • सामाजिक भूमिका - सुविधा देणार्‍याने त्यांच्या विस्तारित तांत्रिक अधिकारांसह या नियमांचे पालन करण्यास समर्थन देणे आणि आवश्यक असल्यास अतिरिक्त उपायांचे समन्वय करणे अपेक्षित आहे. सहभागींना वगळून आणि व्हिडिओ कॉन्फरन्स बंद करण्यासह या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सुविधा देणारा कोणतीही कारवाई करू शकतो. असे निर्णय सत्रातील सहभागींना आणि आयोजकांना कळवले जातील. सुविधा देणार्‍याने त्यांच्या अधिकारांचा काटेकोरपणे सद्भावनेने वापर केला पाहिजे, कारण आदरपूर्ण चर्चेसाठी आणि सहभागींची सुरक्षा आणि गोपनीयता लक्षात घेऊन.

अंमलबजावणी

  • व्यक्तिगत जबाबदारी - All participants are responsible for compliance with these rules to the best of their ability.
  • दाद मागणे - If you believe that someone else is not following this policy, you have the following options:
  1. point out the terms openly,
  2. inform only the facilitator (for example, by using the direct chat function) and/or
  3. inform the organisers at: wmwm@cis-india.org
  • कार्यवाही - In case of violations, the facilitator can act immediately. The participant may be expelled or blocked from the session or the entire event. In the case of particularly serious violations, we can also pass on data to third parties to aid in addressing complaints, including and up to identification of the participant as a harasser to other participants or the general public.

तक्रार निवारण

If you have a complaint against someone on the organising team, they will recuse themselves from handling the reported incident. We will respond as promptly as we can to take note of your complaint, discuss the matter, and resolve the issue in a safe and respectful manner for all parties involved. We will also accept good-faith reports of unacceptable behaviour, including harassment, and respond as promptly as possible. We will not name victims without their affirmative consent. In order to protect volunteers from abuse and burnout, we reserve the right to reject any report we believe to have been made in bad faith or to silence legitimate criticism.

Please note that this event prioritises marginalised people’s safety over privileged people’s comfort. The organisers reserve the right not to act on complaints regarding:

  • 'Reverse' -isms, including 'reverse racism,' 'reverse sexism,' and 'cisphobia'
  • Reasonable communication of boundaries, such as “leave me alone,” “go away,” or “I’m not discussing this with you”
  • Communicating in a 'tone' you don’t find congenial
  • Criticising racist, sexist, cissexist, or otherwise oppressive behaviour or assumptions

हे ही पहा